शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महेश मांजरेकर भिलवडी घाटाच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:44 IST

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ऐतिहासिक कृष्णाघाट भिलवडी पुलावरून येणा-जाणाºया लोकांना नेहमीच भुरळ घालत असतो. याला अपवाद सिनेमासृष्टीतील कलाकार कसे असतील! प्रसिद्ध सिनेअभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर ही इतिहासप्रसिद्ध कृष्णा नदीवरील घाटाच्या प्रेमात पडले.कुस्तीवर आधारित असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटाचे चित्रीकरण भिलवडी येथील कृष्णा घाटावर सुरू ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कभिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील ऐतिहासिक कृष्णाघाट भिलवडी पुलावरून येणा-जाणाºया लोकांना नेहमीच भुरळ घालत असतो. याला अपवाद सिनेमासृष्टीतील कलाकार कसे असतील! प्रसिद्ध सिनेअभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकरही इतिहासप्रसिद्ध कृष्णा नदीवरील घाटाच्या प्रेमात पडले.कुस्तीवर आधारित असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटाचे चित्रीकरण भिलवडी येथील कृष्णा घाटावर सुरू होते. यावेळी संथ वाहणारी कृष्णामाई, नदीपात्रात असणारी मंदिरे, काळ्याकुट्ट पाषाणातील तटबंदी, नदीकाठच्या मळीच्या शेतामधील ऊस व केळीची हिरवीगार पिके, उंच असणाºया पुलांवरून चाललेली वाहतूक ही सर्व दृश्ये बघून ते येथील निसर्गात दिवसभर रमले.ऐतिहासिक कृष्णा घाटावर सुजय डहाके दिग्दर्शित ‘केसरी’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले. मांजरेकर यांच्यावर चित्रपटाचा काही भाग येथे चित्रीत करण्यात आला. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये विराट मडके, रुपा बोरगावकर, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी या प्रमुख कलाकारांचा समावेश आहे. चित्रीकरण पन्हाळा, कोल्हापूर, पुण्यासह भिलवडीसारख्या ग्रामीण भागामध्ये झाले आहे. चित्रीकरण अंतिम टप्प्यात आहे.ग्रामीण भागामध्ये महेश मांजरेकरांसारखा अभिनेता चित्रीकरणासाठी आल्याने त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.मांजरेकरांचा साधेपणासिनेकलावंत पडद्यावर कसे असतात व पडद्यामागे कसे, याची उत्सुकता लोकांना जास्त असते. महेश मांजरेकर चित्रीकरण झाले की घाटावर निवांत भारतीय बैठक मारत. आलेल्या नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारीत. त्यांच्यातला साधेपणा लोकांना चांगलाच भावला. आपल्या गावात असणाºया ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्याचा सल्ला ही भिलवडीकरांना त्यांनी सडेतोडपणे दिला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकSangliसांगली